प्रभादेवीतील 'बो मोंड' इमारतीला भीषण आग

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू 

प्रभादेवीतील 'बो मोंड' इमारतीला भीषण आग

मुंबई : प्रभादेवी परिसरात इमारतीला आग लागली आहे. 'बो मोंड' असं नाव असलेल्या या इमारतीच्या अगदी वरच्या 33 व्या मजल्यावर ही आग लागली आहे.  इमारतीच्या टॉप फ्लोअरला ही आग लागली आहे. आतापर्यंत या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 3 वॉटर टँक घटनास्थळी पोहोचले आहे. इमारतीला सव्वा दोनच्या सुमारास ही आग लागली. लेवल 2 ची आग असल्यामुळे अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. इमारतीच्या बी विंगमध्ये आग लागली आहे. 

या इमारतीच्या आजूबाजूला इतर इमारतींची गर्दी आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला थोडा त्रास होत आहे. 33 व्या मजल्यावर लोकं राहत असल्याचं देखील समजत आहे. त्यांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं आहे. अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे दीपिका पदुकोण या इमारतीत राहते.