मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे... झी 24 तासवर

Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 16, 2024, 07:44 AM IST
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे...  झी 24 तासवर title=

Maharashtra Vidhansabha AI Survey : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते विधानसभा निवडणूक 2024 कडे. विधानसभेसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) थेट लढत रंगणार आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याचं उत्तर आपल्याला निवडणुकीनंतरच मिळेल. पण महायुती आणि महाविकास आघाडीने आपला पूर्ण जोर लावला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. यानिमित्ताने वेगळेपणाचा ध्यास असलेल्या झी 24 तासने पुन्हा इतिहास रचला आहे.  शुक्रवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 6  वाजल्यापासून हा AI सर्व्हे झी 24 तासवर पाहाता येणार आहे.  महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे. 

झी 24 तासचा सर्वात मोठा AI सर्व्हे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दोन महिन्यांवर आली असताना  झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर करणार आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे.

कोणत्या आधारावर सर्व्हे
मतदारांच्या मनातील प्रश्नांच्या आधारे हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय चित्र बदललं? महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं राज्य येणार? लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती मिळणार? विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार का? महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार? हे आणि महाराष्ट्रातील मतदारांशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे.