दिलासादायक ! एप्रिल महिन्यानंतर प्रथमच धारावीत आज कोरोनाच एकही रुग्ण नाही

मुंबईकरांना मोठा दिलासा

Updated: Dec 25, 2020, 08:34 PM IST
दिलासादायक ! एप्रिल महिन्यानंतर प्रथमच धारावीत आज कोरोनाच एकही रुग्ण नाही title=

मुंबई : एप्रिल महिन्यानंतर प्रथमच धारावीत आजची रुग्णसंख्या शून्यावर आहे. १ एप्रिलला पहिला रूग्ण धारावीत मिळाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच आज धारावीतून एकही रूग्ण मिळालेला नाही. सध्या धारावीत केवळ १२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी ८ होम क्वारंटाईन आहेत तर ४ जण सीसीसी २ मध्ये दाखल आहेत. धारावीतील आतापर्यंतची एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३७८८ असली तरी ३४६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान आज राज्यात कोरोनाचे 3 हजार 431 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 427 जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.4 टक्के इतकं झालं आहे. आज 71 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह केसेसचा आकडा 56 हजार 823 वर गेला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x