अरुण गवळी संचित रजेवर, नागपुरच्या कारागृहातून सुटका

मुंबईतील निवडणूक संपल्यानंतर अरुण गवळी यास रजा मंजूर झाली आहे. 

Updated: May 9, 2019, 12:10 PM IST
अरुण गवळी संचित रजेवर, नागपुरच्या कारागृहातून सुटका  title=

नागपूर : अरुण गवळी याची फर्लो म्हणजेच संचित रजेवर नागपूरच्या केंद्रीय कारागृहातुन सुटका करण्यात आली आहे. काल संध्याकाळी ही सुटका झाली आहे. सध्या देशभरात निवडणुकीते वारे जोरात वाहत आहेत. काही दिवसांपुर्वीच तिसऱ्या टप्प्यातील मुंबईची निवडणूक संपली. मुंबईची निवडणूक होण्यापूर्वीच अरुण गवळी याने संचित रजा मिळावी अशी मागणी केली होती. मुंबईतील निवडणूक संपल्यानंतर अरुण गवळी यास रजा मंजूर झाली आहे. 

संचित रजा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संचित रजा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निवडणूक काळात अरुण गवळीची उपस्थिती मुंबईतील निवडणुकीवर परिणाम करेल असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने मुंबईतील निवडणूक पूर्ण झाल्यानंतर गवळीला रजेवर सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काल संध्याकाळी अरुण गवळी ला 28 दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले आहे.