Ganesh Chaturthi 2022 : तुझ्या कृपेचा हात मस्तकी! सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, पाहा यंदाच्या वर्षाची पहिली आरती

अंगावर शहारा आणणारे आरतीचे क्षण... 

Updated: Aug 31, 2022, 07:55 AM IST
Ganesh Chaturthi 2022 : तुझ्या कृपेचा हात मस्तकी! सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, पाहा यंदाच्या वर्षाची पहिली आरती title=
Ganesh chaturthi 2022 Ganeshotsav lalbaughcha raja ganeshgalli pune dagdusheth live darshan

Ganesh Chaturthi 2022 : सलग दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर बाप्पांचं दणक्यात आगमन झालं आहे. कोरोनाच्या नाकावर टिच्चून यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे आणि आज या मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. वर्षभराची मरगळ मागे टाकत सर्वांनी नव्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आहे. 

मुंबई, महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशभरात सध्या गणपतीची विधीवत पूजा करत प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. मुंबईत प्रमुख आकर्षण असणाऱ्या (Lalbaugcha raja) लालबागचा राजा, (Ganeshgalli) गणेशगल्ली मुंबईचा राजा, (Chinchpoklicha chintamani) चिंचपोकळीचा चिंतामणी, राजा तेजुकायाचा या आणि अशा सर्व गणेशोत्सव मंदिरांममध्ये भल्या सकाळी गणपतीची पूजा संपन्न झाली आहे. (Ganesh chaturthi 2022 Ganeshotsav lalbaughcha raja ganeshgalli pune dagdusheth live darshan )

अखंड (Mumbai) मुंबईचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरातही गणेशोत्सवातील पहिल्या आरतीचे सूर दुमदुमले आणि मंदिर परिसर त्या स्वरांत न्हाऊन निघाला. 

तिथे (Pune) पुण्यातही मानाच्या गणपतींचरणी श्रद्धासुमनं अर्पण करण्यासाठी ढोल-ताशा पथकं सज्ज झाली आहेत. गल्लीबोळातून आणि घराघरातून गणपती बाप्पा मोरया असाच जयघोष सुरु आहे. 

गणपती बाप्पाचं आगमन सर्व ठिकाणी जल्लोषात होत असतानाच नागपूरमध्ये देखील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन उत्साहात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीची बाप्पा विराजमान झाले. 

मुंबई महानगरपालिका सज्ज (Mumbai BMC)
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह पाहता बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आणि विशेष करुन विसर्जनासाठी पालिकेनं खास तयारी केली आहे. महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.