Lalbaugcha Raja Visarjan 2022 : ही शान कुणाची..?लालबागचा राजा गणपतीचा विसर्जनाचा थाट

गणपती बाप्पा मोरया,   (Mumbai Ganesh Visarjan)  पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) , मुंबईचा राजा (Mumbaicha Raja), गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल.

Updated: Sep 9, 2022, 11:37 AM IST
Lalbaugcha Raja Visarjan 2022 : ही शान कुणाची..?लालबागचा राजा गणपतीचा विसर्जनाचा थाट  title=

Anant Chaturdashi : गणपती बाप्पा मोरया,   (Mumbai Ganesh Visarjan)  पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) , मुंबईचा राजा (Mumbaicha Raja), गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. (ganpati visarjan 2022 live lalbaugcha raja and ganesh galli mumbai )

गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी (Mumbai Ganesh Festival) लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. दरम्यान, सकाळपासूनच लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची लगबग पाहायला मिळाली. अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे. मोठ्या उत्साहात, थाटामाटात आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे.

जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएपच्या 8 तुकड्या पोलिस बंदबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर 3 हजार अधिकरी आणि 15 हजारांच्या वर पोलीस बंदोबस्तातानी तैना करण्यात आलेत. 

मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.