घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  

Updated: Jul 25, 2017, 04:09 PM IST
घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता title=

मुंबई : घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नऊ जखमींना वाचवण्यात यश आलंय. तसंच एका महिलेला जीवंत बाहेर काढण्यात यश आलंय. 

काही जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर काहींना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे. घाटकोपरमधल्या दामोदर पार्क भागातल्या साई अपार्टमेंटमधील रहिवासी इमारत सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोसळली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही इमारत धोकादायक नसल्याची माहिती महापालिका आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलीय.