जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना ३० वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी २७ जून रोजी ही घटना घडलीय. 

Updated: Jun 28, 2017, 11:25 AM IST
जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू title=
प्रातिनिधिक फोटो

वसई : जिममध्ये व्यायाम करताना ३० वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी २७ जून रोजी ही घटना घडलीय. 

मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वसईच्या 'एव्हरशाईन जिम'मध्ये ही तरुणी व्यायाम करण्यासाठी गेली होती. जेनिडा कार्व्हालो असं मृत तरुणीचं नाव असून ती 'मधूबन हाईटस'मध्ये राहत होती.

वसईच्या एव्हरशाईन सिटी भागात 'एव्हरशाईन जिम' नव्यानेच सुरु झालीय. या जिममध्ये वर्क आऊट करत असताना ती खाली कोसळली. जिममधील लोकांनी बाजूच्याच आयसिस रुग्णालयात तिला दाखल केलं.

परंतु, हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच जेनिडाचा मृत्यू झाला होता.. डॉक्टरने तिला मृत घोषित केले. तुलिंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.