मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करु नका, जीवावर बेतू शकतं, असं वारंवार आवाहन करुनही स्टंट करण्याचे प्रकार सुरुच आहेत. हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करतानाचे प्रकरण समोर येत असतात. १० ते १५ वर्ष वयोगटातील ही चार मुलं आहेत. मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्टेशन दरम्यान ही मुलं स्टंट करत होते. धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना खाली पडून किंवा खांब लागून काही जणांचा मृत्यू झालायं. यावेळेस एका मुलीचा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलायं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलं होतोयं.
या व्हिडिओमध्ये मुलगी ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला लटकताना दिसत आहे. जसजशी ट्रेन सुरू होते तस ती स्टंट करायला सुरूवात करते. तिचा एकच पाय ट्रेनच्या आतमध्ये असून बाकी संपूर्ण शरीर हवेत आहे. जसं तिचं स्थानक येतं तसं ती स्टंट करतं निघूनही जाते.
#MumbaiLocalStuntGirl In my knowledge this is first ever stunt girl in #Mumbai local. Train 11:26 pm from CST to Vashi. Girl and boy boarded from Reay road and get down at cotton green. This is First class middle coach. Date: 30.8.18@srdscmumbaicr @drmmumbaicr @Central_Railway pic.twitter.com/ps6olgbrFN
— Damodar vyas (@damuNBT) August 31, 2018
सीएसटीएमकडून वाशीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याचा व्हिडिओ एका व्टिटर युजरने शेअर करत, 'मुंबई लोकलमधली स्टंट गर्ल, माझ्या माहितीनुसार मुंबई लोकलमध्ये स्टंट करणारी ही पहिली मुलगी असे. ट्रेन वाशी रात्री ११.२६ वाजता.' अशी पोस्टही लिहिली.