मुलींने तोकडे कपडे घालू नये, जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचा अजब फतवा

मुलींवर अशा पद्धतीची बंधंने लादण्यात आल्याने, विद्यार्थिनींकडून संताप व्यक्त होत आहे. 

Updated: Mar 24, 2019, 10:19 AM IST
मुलींने तोकडे कपडे घालू नये, जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचा अजब फतवा title=

मुंबई : जिकडे - तिकडे मुलींच्या तोकड्या कपड्यावरून वाद निर्माण होताना आपण सर्वत्र पाहतो. पण आता चक्क मुंबईमध्ये सुद्धा मुलींच्या तोकडे कपडे घालण्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील जे जे वैद्यकीय महाविद्यालयाकडून मुलींसाठी अजब फतवा काढण्यात आला आहे. मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, कॅम्पसमध्ये मुला मुलींनी एकत्र फिरु नये असा नवा नियम महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडून काढण्यात आल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली आहे. महाविद्यालयात 'अस्तित्व' हा मोहत्सव सुरु होता, त्या दरम्यान मुलींवर अशा पद्धतीची बंधंने लादण्यात आल्याने, विद्यार्थिनींकडून संताप व्यक्त होत आहे. 

त्याचप्रमाणे मुलींच्या बाहेर फिरण्याच्या वेळेत सुद्ध महाविद्यालयाने अटी लादल्या आहेत. वसतीगृहात मुलींनी रात्री दहापर्यंत पोहचण्याच्या नविन नियमालाही विरोध केला जातोय. मुलांना अशा पद्धतीचे नियम लागू नाहीत, मग केवळ मुलींसाठी हे नियम का असा प्रश्न विद्यार्थिनींकडून विचारला जातोय. 

होळीच्या दिवशी जे जे वैद्यकीय महाविद्यालयात मुला मुलींनी बेताल वर्तन केलं. त्यावर कारवाई म्हणून हे नियम घालून देण्यात आल्याचं, जे जे चे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी सांगितलंय. तसंच एका कार्यक्रमापुरताच हा नियम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.