मुंबई : Gold price today, 28 June 2022 गेल्या काही दिवसांपासून जगातील मोठ्या शेअरबाजारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. शेअर बाजारात मोठी उसळी आणि घसरण सातत्याने दिसून येत आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी व्याजदर कमी केल्यानंतर मंदीसदृश्य वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर गुंतवणूकीसाठी सोने हा चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये सोन्याची मागणी वाढली आहे.
मल्टी कमोडीटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याची किंमत 50616 रुपये प्रति तोळे इतके होते तर चांदीची किंमत 56577 रुपये प्रति किलो इतके होते.
IBJA या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील सोने बाजारातही काहीशी वाढ नोंदवण्यात आली. मुंबईतील शेअर बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 50877 रुपये प्रति तोळे इतकी होती. तर चांदीची किंमत 56626 रुपये प्रति किलो इतकी होती.
सोन्याच्या किंमती सध्या उच्चांकांवरून 4-5 हजार रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे.