हार्बरवासियांसाठी खुशखबर...

  सध्या हार्बर लोकल सीएसटीएम ते पनवेल मार्गावर 80 की मी प्रति तास वेगाने धावते या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग 105 किमी प्रति तास वाढवण्याचे प्रस्तावित आहे असे झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात 10 ते 15 मी बचत होईल. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मुख्यलयात पाठवण्यात आलेल्या आहेत.  या बाबतीतल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षीच हार्बर लोकल चा स्पीड वाढलेला पाहायला मिळेल, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी सांगितले. 

Updated: Apr 3, 2018, 07:15 PM IST
 हार्बरवासियांसाठी खुशखबर...  title=

मुंबई :  सध्या हार्बर लोकल सीएसटीएम ते पनवेल मार्गावर 80 की मी प्रति तास वेगाने धावते या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग 105 किमी प्रति तास वाढवण्याचे प्रस्तावित आहे असे झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात 10 ते 15 मी बचत होईल. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मुख्यलयात पाठवण्यात आलेल्या आहेत.  या बाबतीतल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षीच हार्बर लोकल चा स्पीड वाढलेला पाहायला मिळेल, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी सांगितले. 

75 हजार qubik meter कचरा, डेबरी गेल्या काही महिन्यात विविध रुळाच्या आसपासच्या परिसरातून काढला आहे.  मान्सूनमध्ये मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही,या दृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. महानगर पालिका प्रशासन आणि रेल्वे मध्ये समन्वय साधून हे काम पूर्ण करणार आहोत.

वन रुपी क्लीनिक बद्दल डॉ राहुल घुले यांनी जे आरोप केले आहेत ते आम्हाला माध्यमातून समजले आहेत ते आमच्याशी या विषयी काहीही बोलले नाहीत, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी सांगितले.