मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या बातम्यांवर कोणी विश्वास ठेऊ नये अशा आशयाचे ट्विट स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ऑफिशयल ट्विटर अकाउंटवरून केले आहेत.
मी भाजपा मध्येच राहणार कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे यांच्या फेक अकाऊंटवरुन व अन्य काही अकाऊंट मधून " मी 21 आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार" अशा आशयाची पोस्ट आज सर्वत्र व्हायरल झाली.
सदर बातमी खोटी असून, मी भाजपा मध्येच राहणार आहे. मी भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. वारंवार विविध माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबधित अकाऊंट ची चौकशी करुन, सदरील व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविणार आहे.
मी भाजपा मध्येच राहणार कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे यांच्या फेक अकाऊंटवरुन व अन्य काही अकाऊंट मधून " मी 21 आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार" अशा आशयाची पोस्ट आज सर्वत्र व्हायरल झाली.— Eknath Khadse (@EknathKhadseBJP) April 2, 2018
यापूर्वी एकनाथ खडसे आणि अजित पवार एका मंचावर उपस्थित होते. त्यावेळी माझ्या जे मनात आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले आहे. असे खडसे यांनी यापूर्वी जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यानंतर नुकतेच एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला होता. त्यामुळे खडसे यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होते. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश प्रसारीत झाल्याने आज खडसे यांनी ट्विटरवरून यावर खुलासा केला असून आपला असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.