मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.

Updated: Sep 27, 2017, 12:28 PM IST
मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज title=

मुंबई : मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.

पश्चिम रेल्वेवर 32 लोकल फे-या चालवताना 29 फे-या या उपनगरासाठी, तर 3 फे-या या फक्त चर्चगेटपर्यंत असतील. विशेष म्हणजे 29 पैकी 20 फे-या अंधेरी ते विरार दरम्यान आणि दादर ते विरार दरम्यान 9 जादा लोकल फे-या चालवल्या जातील. यातील सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी चार लोकल फे-या असतील. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

पश्चिम रेल्वेवर दररोज 1323 लोकल फे-या होतात. जादा फे-यांमुळे ही संख्या आता 1355 पर्यंत पोहोचेल. नव्या फे-या चालवताना अंधेरी ते बोरीवली दरम्यानच्या पाचव्या मार्गिकेचाही वापर करण्यात येणार आहे. या मार्गिकेवरून सात लोकल फे-या चालवल्या जातील. तसेच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल या हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 अशा एकूण 28 वाढीव फे-या चालवण्यात येणार आहे.