मुंबई : जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता ऑनलाइन व्यवहारांवर लागणार चार्ज बंद होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने नेट बँकिंगचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना खूशखबर दिला आहे.
एसबीआयने लहान ट्रान्झेक्शनवर लागणारे IMPS चार्ज बंद केले आहेत. स्टेट बॅंकच्या ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंत ट्रान्झेक्शनवर आता कोणत्याही प्रकारच्या आयएमपीएस चार्ज नाही लागणार. आतापर्यंत 1000 रुपयांपर्यंत IMPS चार्ज 5 रुपये लागत होता.
आयएमपीएस चार्जेस हे ते चार्जेस आहेत जे त्वरित ऑनलाईन सेवेवर घेतले जातात. पण एसबीआयने 1000 रुपयापेक्षा जास्त ट्रांजॅक्शनवर लागणाऱ्या आयएमपीएस चार्जमध्ये कोणताही बदल नाही केला आहे.
- 1,000 रु. ते 1 लाख रु. पर्यंतच्या व्यवहारावर 10 रु. चार्जसह जीएसटी वसूल केला जाईल.
- 1 लाख रु. ते 2 लाख रु. पर्यंत IMPS व्यवहारांवर 15 रुपयेसह जीएसटी कर लागेल.