7th Pay Commission: राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी (State Government Employee) एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ करण्यात आली असून महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलै 2022 पासून हा नवा महागाई भत्ता लागून होणार आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा थकीत महागाई भत्ता जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला, पण राज्य कर्मचाऱ्यांना अजून 34 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत होता. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार DA वाढीची मागणी केली जात होती. त्यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात ओ पी एस योजना आणि महागाई भत्ता वाढीबाबत राज्य शासन निर्णय घेईल अशी आशा होती. पण यावर अधिवेशनात चर्चाही झाली नाही. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीएस लागू करण्यासाठी राज्य शासन अक्षम असल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र सरकारने हप्त्याद्वारे डीए वाढवला आहे आणि थकबाकीच्या नावावर पाच हप्ते भरण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत दोन हप्ते देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यानुसार गट अ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ 30 ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान असेल तर गट ब कर्मचाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांची वाढ मिळेल. गट क श्रेणीसाठी सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची भाडेवाढ असेल तर त्याखालील गटांसाठी 8 ते 10 हजार रुपयांची वाढ मिळेल.