मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली असून याकाळात शेतक-यांनी कापणी केलेला अथवा कापणी योग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलंय.
या काळात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना देखील घडू शकतात अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतक-यांनी स्वतःचा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
तसंच मोकळं मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलंय. ५ ते १४ ऑक्टोबर याकाळात मुंबई आणि कोकण पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.