अंधेरी दुर्घटनेवरुन न्यायालयाचे मनपाला खडे बोल

अंधेरी इथे  झालेल्या दुर्घटनेवरून मुंबई मनपाला उच्च न्यायालयाने चांगलंच फैलावर घेतलं.

Updated: Jul 5, 2018, 09:13 AM IST

मुंबई : अंधेरी इथे  झालेल्या दुर्घटनेवरून मुंबई मनपाला उच्च न्यायालयाने चांगलंच फैलावर घेतलं. नागरिकांना गैरसोय निर्माण करणारी कोणतीही घटना आपल्या हद्दीत घडल्यास मुंबई मनपाचीच ती जबाबदारी आहे असं उच्च न्यायालयाने खडसावलं. एलफिन्स्टन रोड इथे झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भात काँग्रेसच्या नेत्या स्मिता ध्रुव यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खडे बोल सुनावले. एलफिन्स्टनबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कालच्या अंधेरी इथल्या अपघाताचाही संदर्भ घेतला. या सगळ्या प्रकारांची जबाबदारी घेण्यास मनपाने आता सुरूवात करावी, ही जबाबदारी आमची नाही असं सांगून हात झटकण्याची सवय थांबवा असं सांगत मनपाचे न्यायालयाने कान उपटले. 
पहा काय म्हटलंय न्यायालयानं...