नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात रोज होणारी वाढ चिंतेचं कारण बनली असताना आज आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ पाहायला मिळाली. आज नवी मुंबईत तब्बल 156 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा आता 3219 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा देखील शंभरावर पोहोचला आहे.
आज नवी मुंबईत 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णामध्ये
बेलापूर 8, नेरुळ 24, वाशी 16 , तुर्भे 40, कोपरखैरणे 15, घणसोली 15, ऐरोली 32 तर दिघा येथील 6 रुग्णांचा समावेश आहे. आज एका दिवसात 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत नवी मुंबईत एकूण 1915 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
#Corona | आज नवी मुंबईत तब्बल १५६ रुग्णांची वाढ. आतापर्यंत १०१ रुग्णांचा मृत्यूhttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/AGO3lomYsv
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 10, 2020
नवी मुंबईला लागूनच असलेल्या पनवेलमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे मुंबईला लागून असलेल्या इतर शहरांमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे.