Shraddha Murder Case ...तर श्रद्धाचा जीव वाचला असता; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

2020 ला श्रद्धा वालकरने जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होते. ते पत्र माझ्याकडे पण आलंय. अत्यंत गंभीर पत्र होतं असं फडणवीस म्हणाले.

Updated: Nov 23, 2022, 05:05 PM IST
Shraddha Murder Case ...तर श्रद्धाचा जीव वाचला असता; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, नागपूर :  दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाने(Shraddha Murder Case)  संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. श्रद्धा वालकरने 2020मध्येच आफताबविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. हत्या करुन तुकडे करण्याची धमकी दिल्याचा उल्लेख देखील श्रद्धाने या तक्रारीत केला होता. हे पत्र आता व्हायरल झाले आहे. यावर राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

2020 ला श्रद्धा वालकरने जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होते. ते पत्र माझ्याकडे पण आलंय. अत्यंत गंभीर पत्र होतं. पण, त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची माहिती नाही. चौकशी का झाली नाही याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही. मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही. त्या पत्रावर कारवाई झाली असती तर आज श्रद्धाचा जीव वाचला असता असे देवेंद्र फडणवीस  म्हणाले. 

श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 मध्ये आफताब जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार तुळींज पोलिसांना दिली होती. यानंतर श्रद्धानेचं तक्रार मागे घेतली होती असेही अप्पर पोलीस उपायुक्ततांनी सांगितले. या पत्रात श्रद्धाने आफताब मारहाण करत मानिसिक छळ केल्याचेही नमूद केले होते. 

श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता.