मोठा खुलासा : 'हनी ट्रॅप'मधून झाला PNB घोटाळा, मास्टरमाईंड आहे ही व्यक्ती?

11 हजार करोड रुपये PNB घोटाळा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 18, 2018, 11:09 AM IST
मोठा खुलासा : 'हनी ट्रॅप'मधून झाला PNB घोटाळा, मास्टरमाईंड आहे ही व्यक्ती?  title=

मुंबई : 11 हजार करोड रुपये PNB घोटाळा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. 

आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यात हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं जातंय. देशातील सर्वात चांगल्या बँकेतून 11 हजार करोड रुपयाचा घोटाळा केला. पण या घोटाळ्यातील मास्टरमाईंड नीरव मोदी नसून ही व्यक्ती आहे. 

11 हजार करोड रुपयाच्या घोटाळ्यातील मास्टारमाईंड 

नीरव यांची अमेरिकन पत्नी एमी या 11 हजार करोड रुपयाच्या घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहे. एवढंच नाही तर नीरव मोदी अमेरिकेत पळून जाण्याचा सर्वात मोठा प्लान तयार करण्यात एमीचा सर्वात मोठा हात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बँकिंग घोटाळ्याला 'हनी ट्रॅप' ने पूर्ण केलं आहे. 

कोण ही मास्टरमाईंड एमी 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही मॉडेलच्या मदतीने बँकेतील उच्च अधिकाऱ्यांना या घोटाळ्यात सहभागी करून घेतलं जात होतं. एवढंच नाही तर मोदीची पत्नी एमीचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे देखील म्हटलं जात आहे. या प्रकरणात आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता असं म्हटलं जातंय की हनी ट्रॅप सारख्या ब्रम्हास्त्राचा वापर केला गेला. या प्रकरणातील मास्टर माईंड म्हणून एमीकडे पाहिलं जात आहे. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर संशयाचे बोट ठेवले आहे. या घोटाळ्याला UPA जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.