HSC Exam | बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक

HSC Exam chemistry paper |  बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. 

Updated: Mar 14, 2022, 10:37 AM IST
HSC Exam | बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक title=

मुंबई : बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे. 

राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. परंतू तरीही मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

 विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली असून, व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे. 

कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाचा दणका

 कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणा-या तीन विद्यार्थ्यांना अटकही करणअयात आलीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकाच दिवसात 41 कॉपी बहाद्दर विद्यार्थी सापडले. राज्यात नऊ विभागीय मंडळात बारावीची परीक्षा सुरु आहे. दररोज काहीना काही गैरमार्ग प्रकरणे आढळून येत आहेत.