मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

Ashish Shelar On Shiv Sena : सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलारांनी केला आहे.  

Updated: Dec 9, 2021, 01:51 PM IST
मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न - आशिष शेलार
संग्रहित छाया

मुंबई : Ashish Shelar On Shiv Sena : सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलारांनी केला आहे. मी कुठलाही गुन्हा केलेला नसल्याचे म्हणत, नाकर्तेपणाचा संघर्ष अजून कडवा करेन असे शेलार म्हणाले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेलारांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. दरम्यान आशिष शेलार मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अधिकाराने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांच्या वक्तव्याबाबतचा सत्यस्थिती अहवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मागवला आहे. गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावे मत चाकणकर यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आशिष शेलार यांच्या घराबाहेर शेलार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शेलार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना आघाडी सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली. जर शेलार यांना अटक केली तर आम्ही अजून आक्रमक होऊ अशी प्रतिक्रियाही कार्यकर्त्याने दिली आहे.