ओमायक्रॉनचे संकट : राज्यात शाळा सुरु होणार का?

School News : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये जवळपास दीड वर्षे बंद होती. मात्र, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम आहे.  

Updated: Dec 9, 2021, 01:04 PM IST
ओमायक्रॉनचे संकट : राज्यात शाळा सुरु होणार का? title=
संग्रहित छाया

मुंबई : School News : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये जवळपास दीड वर्षे बंद होती. मात्र, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालय सुरु झाली आहेत. मात्र, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग अनेक ठिकाणी सुरु झालेले नाहीत. त्यामुळे राज्यात पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम आहे. राज्य सरकारने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron ) पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही, याची शंका आहे. 

दरम्यान, नाताळ सुट्टीमुळे शाळा नवीन वर्षातच सुरु करा, अशी शिक्षक आणि पालकांकडून मागणी करण्यात येत आहे. इंग्रजी शाळांना 23 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान नाताळची सुट्टी आहे. त्यामुळे या 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

राज्यात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा डिसेंबरऐवजी नवीन वर्षातच सुरू करा, अशी मागणी शिक्षक-पालक करत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना 23 ते 1 जानेवारीदरम्यान दरवर्षी नाताळची सुट्टी असते. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरू करण्याची मागणी आता शिक्षक आणि पालक करत आहेत.