...तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही- अजित पवार

नागरिकांनी ३० एप्रिलपर्यंत सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 

Updated: Apr 12, 2020, 08:55 AM IST
...तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही- अजित पवार title=

मुंबई: येत्या ३० एप्रिलपर्यंत नागरिकांनी शिस्तीचे आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तरच लॉकडाऊन उठवता येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली होती. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा आणि सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

देशात मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या

राज्याच्या काही भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही, याचे भान ठेवून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने तो प्यायला सॅनिटायझर आणि....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात असल्याचे म्हटले होते. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असेही त्यांनी म्हटले होते. 

यासाठी आगामी काळात पोलिसांकडूनही कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अजिबात गय करू नका, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत. राज्यभरात आतापर्यंत १,८३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १,१४६ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दादर, धारावी आणि वरळी हे परिसर सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.