लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने तो प्यायला सॅनिटायझर आणि....

दारु मिळत नसल्याने उचललं गंभीर पाऊल

Updated: Apr 11, 2020, 10:20 PM IST
लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने तो प्यायला सॅनिटायझर आणि.... title=

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन सरकार व तज्ज्ञांनी केले आहे. पण कोयंबतूरमध्ये या सॅनिटायझरमुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. खरं तर या व्यक्तीचा मृत्यू सॅनिटायझर प्यायल्याने झाला आहे. कोयंबतूरमध्ये राहणाऱ्या या ३५ वर्षाच्या व्यक्तीने दारु न मिळाल्याने हे पाऊल उचललं आहे.

या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्याने तो अस्वस्थ झाला. यावेळी तो जेथे काम करतो त्या एजन्सीने त्याला हात स्वच्छ ठेवण्यासाठी दिलेली सॅनिटायझर तो पिऊन गेला.

यानंतर बर्नार्डची पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन गेली पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बर्नार्डचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

याआधी केरळच्या तुरूंगातील एका कैद्याने देखील सॅनिटायझर दारु समजून प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला होता.