काही त्रास होत असेल तर..... रुपाली चाकणकर यांनी केलं नवनीत राणा यांना आवाहन

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांना एक आवाहन केलंय.

Updated: May 9, 2022, 07:21 PM IST
काही त्रास होत असेल तर..... रुपाली चाकणकर यांनी केलं नवनीत राणा यांना आवाहन title=

मुंबई : राज्य महिला आयोगाचे ( Rajya Mahila Aayog ) नवीन कायदा बनविण्याचे काम सुरु आहे. या कायद्यामधून महिलांचे अधिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या नव्या कायद्याबाबत महाराष्ट्र सरकार सोबत सुधारणा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankr )  यांनी दिलीय.

भाजप आमदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गणेश नाईक यांनी पोलीस तपासात योग्य ते सहकार्य केले नाही. त्यामुळे इथून पुढे जो तपास सुरु आहे त्यावर राज्य महिला आयोगाचे लक्ष असेल असे त्या म्हणाल्या.

राज्यात महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्न असताना विरोधकांनी महाराष्ट्राला यातून सावरण्याची भूमिका घ्यावी. पण, नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्याबाबतचे विषय आपणास महत्वाचे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

खासदार नवनीत राणा यांना तुरूंगातून सुटल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना तुरुंगात किंवा उपचारादरम्यान काही त्रास झाला असेल किंवा त्रास होत आले तर नवनीत राणा यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी. पण, शांत असलेला महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले.