विजय मल्ल्याला आर्थररोड जेलमध्ये मिळणार या सुविधा

मुंबईच्या ऑर्थररोड जेलमध्ये अमानवीय परिस्थिती आहे, असा आरोप भारतीय चौकशी एजन्सींनी फेटाळून लावला आहे.

Updated: Aug 24, 2018, 09:25 PM IST
विजय मल्ल्याला आर्थररोड जेलमध्ये मिळणार या सुविधा title=

मुंबई : मुंबईच्या ऑर्थररोड जेलमध्ये अमानवीय परिस्थिती आहे, असा आरोप भारतीय चौकशी एजन्सींनी फेटाळून लावला आहे, ब्रिटनच्या एका कोर्टात अशी परिस्थिती नाही, हे स्पष्ट करण्यासाठी एक व्हीडिओ देखील कोर्टाला सोपवला आहे. या व्हीडीओत ऑर्थर रोड जेलची १२ नंबरची कोठडी दाखवण्यात आली आहे. या कोठडीत, विजय माल्ल्याचं भारताकडे प्रत्यार्पण झाल्यानंतर, त्याला नैसर्गिक हवा आणि उजेड मिळू शकेल, असं हा व्हीडिओत दाखवण्यात आलं आहे. 

कारण लंडनच्या कोर्टाला विजय माल्ल्याला भारताकडे सोपवण्याआधी जाणून घ्यायचं होतं की, विजय माल्ल्याला जेलमध्ये नेमकं कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात येईल.

एका न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने दहा मिनिटाचा व्हीडीओ कोर्टाकडे सोपवला आहे. यात लंडनच्या कोर्टाला सांगितलं की, जेलमध्ये नेमक्या कोण कोणत्या सुविधा आहेत. 

याआधी विजय माल्ल्याच्या वकिलांनी प्रत्यर्पणाला विरोध केला होता, आणि आर्थररोड जेलमध्ये अमानवीय सुविधा असल्याचं म्हटलं होतं. विजय माल्ल्यावर भारतीय बँकांचे हजारो रूपये हडप केल्याचा आरोप आहे.

जेलमध्ये मिळणाऱ्या सुविधा

व्हीडीओत दाखवण्यात आलं आहे की, मुंबईतली आर्थररोड जेलच्या बराक नंबर १२ मध्ये टेलिव्हिजन सेट, प्रायव्हेट टॉयलेट, धुण्यासाठी जागा, भरपूर नैसर्गिक प्रकाश, पुस्तकालयाची देखील सुविधा, फिरण्यासाठी गॅलरीची देखील सुविधा आहे. 

एनडीटीव्हीने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलंय की, ब्रिटनच्या कोर्टाला जाणून घ्यायचं आहे की, भारतीय जेल स्वच्छ आहे. आम्ही त्यांना जेलमधील साफ-सफाई आणि आरोग्य सुविधांची देखील माहिती दिली आहे, पुरावे दिले आहेत. मल्ल्याला ज्या बरॅकमध्ये ठेवलं जाईल, ती पूर्व दिशेची असेल, त्यात भरपूर सूर्यप्रकाश येतो.

माल्याच्या वकिलांनी प्रत्यर्पणला विरोध केला होता, भारतीय जेलमध्ये अमानवीय स्थिती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सीबीआयने बरॅक नंबर १२ चा स्टेप बाय स्टेप व्हीडीओ लंडनच्या कोर्टाला सादर केला आहे. याआधी न्यायालयात फोटो दिले होते, जे न्यायालयाने परिपूर्ण नसल्याचं सांगितलं, त्यानंतर व्हीडीओ मागितला होता, त्यानुसार तो देण्यात आला.