साखर कारखाने बंद केले तर निवडून येणार नाही

...तर माझे १४ आमदार आणि ५ खासदार निवडून येणार नाहीत म्हणून साखर कारखाना चालवावा लागतो' अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Updated: Oct 30, 2017, 11:11 AM IST
साखर कारखाने बंद केले तर निवडून येणार नाही title=

अहमदनगर :  'साखर धंदा तसा फायद्याचा नाही तो चालवतांना नाकी नऊ येतात. मात्र मी जर साखर कारखाना बंद केला तर माझे १४ आमदार आणि ५ खासदार निवडून येणार नाहीत म्हणून साखर कारखाना चालवावा लागतो' अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

ते अहमदनगर जिल्ह्यातील युटेक या खासगी साखर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थीत होत्या.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनि शिंगणापुर इथे शनि देवाचं दर्शन घेतलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं गळीत हंगाम शुभारंभाला जात असताना शनि शिंगणापुरला भेट दिली. 
नितीन गडकरी, जलसंधारण मंत्री राम शिंदे, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला अभिषेक केला. यावेळी गडकरी यांनी शनिदेवाकडे काय साकडं घातलं असावं याबाबत चर्चा होती.