प्रदुषीत हवेचा मुंबईला विळखा; उपनगरेही त्रस्त

वाढते नागरिकिकरण, औद्योगिकता आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण.  यांमुळे मुंबईच्या प्रदुषणावर मोठा परिणाम झाला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 6, 2018, 08:27 PM IST
प्रदुषीत हवेचा मुंबईला विळखा; उपनगरेही त्रस्त title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : वाढते नागरिकिकरण, औद्योगिकता आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण. त्यातच अचानक उद्भवलेले ओखी वादळ आणि त्यानंतर कोसळलेला पाऊस. यांमुळे मुंबईच्या प्रदुषणावर मोठा परिणाम झाला आहे.

मुंबईच्या हवेत धुरक्याचा समावेश

सध्या मुंबईच्या हवेचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे मंबईच्या हवेचा प्रदुषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामेही सुरू आहेत. त्यातून निर्माण होणारे माती आणि धुळीचे कण हवेत मिसळतात. या सगळ्यांचा परिणाम मुंबईतील हवा प्रदुषीत होण्यात होत आहे. सध्यास्थितीत मुंबईत धुर, धुके आणि धुरके याचा समावेश आहे.

एक्यूआय' उपक्रमाद्वारे हवेची प्रदुषीत पातळी थेट समजते

भारतातील शहरांचे प्रदुषण आलेखात मोजण्याची सुरूवात झाल्याला अनेक वर्षे झाली. पण, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदाच एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाद्वारे हवेतील प्रदुषणाची थेट पातळी समजते.

नागरीकांना डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास

दरम्यान, प्रदुषीत हवेमुळे नागरिकांना हृदय, फुप्फुसाचा त्रास होताना दिसत आहे. तसचे, प्रदुषीत हवा श्वासोच्छासाद्वारे शरीरात गेल्यामुळे लोकांना सर्दी, डोकेदुखी, खोकला आदी समस्यांचा त्रास होत आहे. विशेष असे की, या प्रदुषीत हवेमुळे लोकांना झालेले सर्दी, डोकेदुखी आणि खोकला नेहमीप्रमाणे प्राथमिक उपचार घेऊन कमी होतना दिसत नाहीत. अलिकडील काळात हे विकार जास्त काळ राहात असून, डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेतल्याशिवाय ते कमी होताना दिसत नाहीत.

वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात भर

दरम्यान, मुंबईतील वाढत्या प्रदुषणास प्रामुख्याने वाहनांची वाढती संख्या कारणीभूत असल्याचे पुढे येत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून, मुंबई आणि उपनगरांतील हवेत नायट्रोजन ऑक्साइड्सचे (नायट्रिक ऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइड) यांचे प्रमाण वाढले आहे. हे रसायन हवेतील बाष्पाशी संपर्कात आल्यास त्यातून आम्लनिर्मीती होते. अम्लाचे हे कण इतके छोटे असतात की, ते श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे नागरिकांना श्वसननलिकादाह (ब्रॉन्कायटिस) होण्याचा धोका वाढतो.