Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी

 पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित

Updated: Mar 27, 2021, 10:24 AM IST
Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत पंचांची खराब अम्पायरिंग पाहायला मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यातही असेच काहीसे घडले, ज्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. भारताच्या बॅटींग दरम्यान, ऋषभ पंतने 40 व्या षटकात टॉम कुर्रेनच्या शेवटच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप शॉट लावण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या पॅडवर गेला. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि मैदानातील अम्पायर्सनी आऊट दिले.

ऋषभ पंतने (Rishabh Pant) डीआरएस मागितला त्यानंतर मैदानातील अंपायरला त्यांचा निर्णय बदलून त्याला नाबाद द्यावे लागले. रीप्लेजमध्ये असे दिसले की, बॉल पंतच्या बॅटला लागला आणि बॉऊंड्री पार गेला. पण इथेच फील्ड अंपायरकडून मोठी चूक झाली. ऑन-फील्ड पंचांनी पंत आणि टीम इंडियाच्या खात्यात चार रन्स जोडले नाहीत.

आयसीसीच्या नियमांनुसार जर एलबीडब्ल्यूच्या अपीलवर मैदानावरील पंचांनी बॅट्समनला बाद दिले तर बॉल त्याचवेळी डेड मानला जातो. त्यावर एकही रन मिळत नाही. 

थर्ड अंपायरच्या निर्णयानंतरही त्या चेंडूवर आलेल्या धावा फलंदाजाच्या किंवा संघाच्या खात्यात पडत नाहीत. ऑनफिल्ड अम्पायरने आऊट दिल्यानंतर बॉल कुठे गेला याने फरक पडत नाही. 

म्हणूनच पंतच्या बॅटला लागून बॉल बाऊंड्रीपार जाऊनही चार रन्स दिले गेले नाहीत. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अशा प्रकारची घटना घडल्यास त्या संघाच्या पराभवाचे कारण ठरु शकते.