मुंबई, पुणे : राज्यात मुंबई, पुण्यासह आगीच्या मोठ्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज मुंबईतल्या प्रभादेवी भागात इमारतीला आग लागली आहे. ( Mumbai Fire) गॅमन हाऊस इमारतीच्या तळमजल्याला ही आग लागली आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कुर्ला पश्चिमेला पोलीस स्टेशनच्या जवळ एका घराला भीषण आग अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हा विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रभादेवी इथळ्या गॅमन हाऊस इथल्या कमर्शिअल इमारतीला सकाळच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तळमजल्यावर ही आग लागली आहे. आगीचा भडका होऊन वरच्या मजल्यावर आग पसरु नये म्हणून प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली भीषण आग दुसऱ्या दिवशी विझविण्यात आली आहे. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले सनराईज रुग्णालय आगीच्या विळख्यात सापडले. रुग्णालयातील 11 रुग्णांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीप्रकरणी 8 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
बदलापुर खरवई एमआयडीसीतल्या ईस्टर इंडिया या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या होत्या. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आलं. आगीत सपूर्ण कंपनी जळून खाक , गेल्या तीन महिन्यान पासून कंपनी होती बंद. ट्राय ब्यूटाइल हाइड्रो पेरिक्सीडे तयार करणारी कंपनी आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
पुण्याच्या ( Pune Fire) कॅम्प परिसरामध्ये फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. फॅशन स्ट्रीट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापडाची दुकानं आणि गोदामं असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. खूप स्टॉल्स आगीत जळून खाक झालेत...तर आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे.
पुण्यातील खराडीतील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडलीय. शुक्रवारी दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीचा जवळपास आठ ते दहा दुकानांना फटका बसला. अग्निशमन दलाच्या चार बंबानी आग विझवली.. आगीची भीषणता अधिक असल्याने लाखोंचं नुकसान झाले.
विरारच्या जीवदानी गडावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वणवा पेटून आगीचा भडगा उडाला होता. काही वेळातच ही आग डोंगरावर पसरली होती. जीवदानी गडावर भाविकांना मंदिरात नेण्यासाठी मंदिर ट्रस्टच्यावतीने फनीक्युलर ट्रेन ची सुविधा करण्यात आली असून या ट्रेन ट्रक अगदी थोड्याच अंतरापर्यंत या आगीचे लोळ पसरले होते.. त्यामुळे या ट्रेनच्या केबल जळण्याचा धोका होता. रात्रीच्या सुमारास मंदिर ट्रस्टकडून ट्रेनची सुवीधा बंद होती त्यामुळे सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र ही आग लावली की लावण्यात आली याचा शोध घेतला जात असून रात्री उशिरापर्यंत मंदिर ट्रस्टच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. वसई विरार मधल्या डोंगराळ भागात आग लागण्याचे सत्र सुरूच असून दहा दिवसांपूर्वी सातीवली खिंड परिसरात अशीच आग लागली होती.