Mumbai goa madgaon vande bharat express : सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण कोणतं असा प्रश्न विचारला असता अनेकांचीच पसंती काही निवडक ठिकाणांना असते. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे गोवा (Goa). निळाशार समुद्रकिनारा, पायांखालून निसटणारी वाळू, किनाऱ्यापाशी येणारे आणि क्षणात दिसेनासे होणारे शंखशिंपले अशा वातावरणानं भारलेल्या या गोव्याच्या किनाऱ्यावर निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी अनेकजण येतात. पर्यटकांचा हा ओघ आता आणखी वाढत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे मुंबई-गोवा (मडगाव) वंदे भारत एक्स्प्रेस.
किमान वेळात गोव्यात पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाडीमुळं मोठं अंतर कमीत कमी वेळात ओलांडणं अगदी सहज शक्य झालं आहे. आरामदायी प्रवास आणि कोकणातून पुढे जाणारी वाट पाहता हा प्रवास नेमका कधी पूर्ण होतो हेच लक्षात येत नाही. अशा या मुंबई-गोवा (मडगाव) वंदे भारत एक्स्प्रेसनं तुम्हालाही प्रवास करायचाय?
Mumbai goa madgaon vande bharat express आठवड्यातून 6 दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा दिवशी प्रवाशांच्या सेवेत असते. दादर, ठाणे, पनवेल ,खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम अशा स्थानकांवर ही रेल्वे थांबते. ही सेमी हायस्पीड रेल्वे तुम्हाला अपेक्षित स्थानकावर साधारण 7 तास 45 मिनिटांत पोहोचवते.
Mumbai Madgaon Vande Bharat Express (22229) ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पहाटे 5 वाजून 25 मिनिचांनी प्रवास सुरु करून दादरला ही ट्रेन सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी पोहोचते. पुढे ठाण्यापपर्यंत ही ट्रेन सकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी आणि पनवेल येथे सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी पोहोचते. खेडला ही वंदे भारत 8 वाजून 24 मिनिटांनी पोहोचते तर, रत्नागिरीत ती पोहोचण्यासाठी सकाळते 9 वाजून 45 मिनिटं होतात. पुढे कणकवली येथे ट्रेन 11 वाजून 10 मिनिटं आणि थिवीमला 12 वाजून 16 मिनिटांनी पोहोचते. मडगाव येथे ही ट्रेन दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते. या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झेक्युटीव्ह चेअर कार असे 9 डबे आहेत.
ट्रेन | चेअर कार | एक्झेक्युटीव्ह चेअर |
दादर- मडगाव | 1595 रुपये | 3115 रुपये |
ठाणे- मडगाव | 1570 रुपये | 3045 रुपये |
कल्याण- मडगाव | 1595 रुपये | 3115 रुपये |
खेड - मडगाव | 1185 रुपये | 2265 रुपये |
रत्नागिरी- मडगाव | 995 रुपये | 1790 रुपये |
थिवीम- मडगाव | 435 रुपये | 820 रुपये |
मुंबई- मडगाव | 1595 रुपये | 3115 रुपये |
परतीच्या प्रवासासाठी मडगाव- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक 22230 मडगावहून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी प्रवास सुरु करते आणि मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही ट्रेन रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी पोहोचते. काय मग, कधी निघताय गोव्याला?