'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Apr 12, 2024, 04:16 PM IST
'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर? title=
Amol Kirtikar ED Enquiry

Amol Kirtikar ED Enquiry: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवाराकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची महाविकास आघाडी कडून घोषणा करण्यात आली. अमोल किर्तिकर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. तर खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचे एक विश्वासू शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन कीर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस मध्ये बंड केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना युती धर्म पाळता येत नाही असा आरोप संजय निरुपम यांनी केला.अमोल कीर्तिकर यांची खिचडी घोटाळाप्रकरणी चौकशी चालू आहे अशा उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही असे सांगितले. काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करून संजय निरुपम यांना पक्षातून बडतर्फ केले तर खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. 

अमोल कीर्तिकर यांच्यावरील आरोपामुळे गजानन किर्तीकर व्यथीत झाल्याचे जाणवले. यानंतर पक्ष श्रेष्ठींचा आदेश पाळून ते काय भूमिका घेतात? हे लवकरच कळणार आहे. उत्तम पश्चिम मतदार संघातून माझा मुलगा अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत असल्याने येथील शिवसेना उमेदवार कोणता असावा? हे ठरवण्याचा नैतिक अधिकार माझा नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीत सर्व कागदपत्रे दाखवण्यात आली आहेत. तरी पुन्हा तेच तेच प्रश्न विचारले जात आहे. 

'ईडी बंद करा'

अमोलची दोन वेळा चौकशी केली असता त्यामध्ये जी पहिली कागदपत्र सादर केली होती तीच कागदपत्र दुसऱ्या वेळीदेखील सादर केली. यामध्ये म्हशीलकर या कंपनीचे मालक होते. कोविड काळाच्या दरम्यान अतिशय संवेदनशील असा प्रकार होता. अशामध्ये अमोल आणि त्याचे मित्र संजीव यांनी खिचडी गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. त्या खिचडीचे मानधन त्यांच्या बँकेमध्ये आले. त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न करून झाले. सर्व बाबी व्यवस्थित होत्या. तरीसुद्धा अमोलची दोन वेळा चौकशी झाली. याप्रकरणी पक्षाचा खूप दबाव आहे का? अमोल किर्तिकर लोकसभेचे उमेदवार म्हणून डिक्लेअर केले होते त्यामुळे हा मनात राग आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर गजानन कीर्तिकरांनी प्रतिक्रिया दिली. ईडी बंद करा. काही गरज नाही. आता लोकही कंटाळले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

'संजय निरुपम एक बेडूक'

यावेळी गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांच्यावर टीका केली. याला शिवसेनेने मोठा केला. याने अपुरी पत्रकारिता केली.  मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात आला होता. सामना पेपरमध्ये नोकरीसाठी लागला. बाळासाहेबांच्या जवळ राहू लागला आणि खासदार झाला. त्याची पावलं राजकारणाकडे पडू लागली. राजकारणात बेडूक उडी मारणारे खूप आहे. त्यापैकी तो एक आहे, अशी टीका गजानन कीर्तिकर यांनी केली.