INS Vikrant निधी घोटाळा प्रकरण, हाय कोर्टाचा सोमय्या पित्रा-पुत्रांबाबत मोठा निकाल

आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलनातील पैसा स्वतःकडे ठेवत जनतेची फसवणूक केल्याचा गुन्हा

Updated: Aug 10, 2022, 05:01 PM IST
INS Vikrant निधी घोटाळा प्रकरण, हाय कोर्टाचा सोमय्या पित्रा-पुत्रांबाबत मोठा निकाल title=

मेघा कुचिक, झी मराठी, मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) निधी संकलन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सोमय्या पितपुत्रांना दिलासा आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या (Neel Somaiya) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांची याचिका निकाली काढली. 
दोघांविरोधात तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची याचिका निकालात काढली

पोलिसांकडून सोमय्या पिता-पुत्रांना नवा समन्स
दरम्यान किरीट आणि नील सोमय्या यांची पोलीस चौकशी सुरूच राहणार आहे. दोघांनाही अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देण्याचे  पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत. मुंबई पोलिसांसमोर या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे नवे समन्स मात्र पोलिसांकडून जारी केले जाईल. 

पोलिसांकडून किरीट सोमय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमय्यांची 18 ऑगस्टला आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकल प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे. 

सोमय्या पिता-पुत्रांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलनातील 57 कोटी रुपये स्वतःकडे ठेवत जनतेची फसवणूक केल्याचा गुन्हा माजी लष्करी कर्मचारी बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात नोंदवला होता. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.