मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास स्वाती साठेंकडून काढून घेतला

भायखळा कारगृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास कारगृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. यापुढे हे प्रकरण महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलंय.

Updated: Jul 7, 2017, 03:56 PM IST
मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास  स्वाती साठेंकडून काढून घेतला title=

मुंबई : भायखळा कारगृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास कारगृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. यापुढे हे प्रकरण महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलंय.

विशेष म्हणजे सिन्हा यांनी हे प्रकरण मीडियापासून माहिती लवण्याचा प्रयत्न केला होता.  त्यामुळे तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित होतंय. मंजुळा शेट्ये हत्याप्रककरणी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी चौकशीतून मुक्त करण्याची मागणी केलीय. 

मंजुळा शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करत असून त्यांनी कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सस ग्रुपवर केलेल्या एका मॅसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत आल्या. 

स्वाती साठे यांनी कारागृह प्रशासनाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या ६ जेल महिला पोलीसांना वाचवले पाहिजे. त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभं राहिलं पाहिजे असा मॅसेज केला होता.  त्या मेसेजच्या सकाळपासून मीडियामध्ये आलेल्या बातम्यामुळे चौकशीतून मुक्त करण्याची मागणी करत असल्याचं स्वाती साठेंनी पत्रात म्हटलंय. मी या प्रकरणाची चौकशी करणं यापुढे तत्वतः योग्य नसल्याचं साठेंनी म्हटलंय.