आयपीएल बेटिंग प्रकरण : अरबाज खानबाबत आणखी एक खुलासा

आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. बुकी सोनू जालान यानं सिने अभिनेता अरबाज खान याच्या नावानं कधीच बेटिंग केलं नाही, अशी नवी माहिती चौकशीत पुढं आलीय. 

Updated: Jun 5, 2018, 04:56 PM IST
आयपीएल बेटिंग प्रकरण : अरबाज खानबाबत आणखी एक खुलासा

मुंबई : आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. बुकी सोनू जालान यानं सिने अभिनेता अरबाज खान याच्या नावानं कधीच बेटिंग केलं नाही, अशी नवी माहिती चौकशीत पुढं आलीय. अरबाज खान सोनू जालानला आपल्या वतीनं बेटिंग करायला सांगायचा. मात्र बेट लावलीय, असं सोनू त्याला खोटंच सांगायचा. बेटचं काय झालं, अशी विचारणा अरबाजनं केल्यानंतर मी हिशेब डायरीत लिहून ठेवलाय, असं सोनू त्याला सांगायचा.

गेल्या वर्षी जेव्हा अरबाजनं डायरीतील हिशोब विचारला तेव्हा सोनूनं त्याला सांगितलं की, तू हरला आहेस... तू मला पावणे तीन लाख रूपये देणं आहेस... पण मी सध्या तुझ्याकडं पैसे मागत नाही. ते बेटिंग लावत राहा... काही दिवसांनी अरबाजनं पुन्हा विचारणा केली तेव्हा सोनूनं सांगितलं की, तू जिंकला आहेस... तुझे मागचे पैसे वसूल झाले आहेत.. आता तू मला काहीही देणं लागत नाहीस... त्यामुळं सोनू हा बेटिंगच्या नावाखाली अरबाजला फसवत होता. 

अरबाजच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा तो स्वतःच्या व्यवसायासाठी वापर करून घ्यायचा, अशी माहिती तपासात समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सोनू जालान ज्यांची महागडी कार चालवत होता, त्या कारचे मालक समीर बुद्धा यांनाही ठाणे खंडणीविरोधी पथकानं चौकशीसाठी बोलावलंय... ही कार पोलिसांनी जप्त केलीय. समीर आणि सोनू यांचे संबंध कसे होते, याची चौकशी ठाणे पोलीस आता करत आहेत.