मुंबई : आयआरसीटीसीचा आयपीओ आज खुला झाला आहे. आयपीओद्वारे ६२८ ते ६३८ कोटी रूपये जमा करण्याचा सरकारचा निर्धार आहे. प्रती समभाग ३१५ ते ३२० रूपये किंमत निर्धारीत करण्यात आलीय. ४० समभाग एकावेळी घ्यावे लागतील. आयपीओद्वारे सरकार १२.६ टक्के भागीदारी विकणार आहे.
१४ ऑक्टोबरला मुंबई शेअर बाजारात आणि निफ्टीत लिस्टींग होणार आहे. आयआरसीटीसीच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांत प्रचंड उत्सुकता आहे.
३ ऑक्टोबरला आयपीओची नोंदणी बंद होणार आहे. या आयपीओबाबत सर्वच ब्रोकर्सनी सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे.
आयआरसीटीसीचा आयपीओ जर खरेदी करायचा असेल तर तो लवकर खरेदी करावा, असा सल्ला गुंतवणूकविषयीच्या तज्ञांनी दिला आहे. आज दुपारी पर्यंत आयआरसीटीसीचे 33 टक्के शेअर्स स्लॅब विकले गेले होते.