मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात परतलेल्या नागरिकांची कोरोनाचे लक्षण विचारून चाचणी करण्यात येत आहे. नुकताच पत्रकार अबिरा धर न्यूयॉर्कमधून भारतात परतल्या आहे. भारतात परतल्यानंतर कशाप्रकारे कस्तुरबा रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा कस्तुरबा रुग्णालयातील अनुभव त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सांगितला आहे.
सर्वात प्रथम त्यांनी नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहेत. 'ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अन्य व्यक्तींना प्रवेश बंद आहे. मी त्याठिकाणी पोहोचले तेव्हा मला चाचणी कक्षात दाखल केलं. त्यानंतर २४ तासांत माझे रिपोर्ट नेगेटीव्ह आले.' असं त्या म्हणाल्या.
त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णालयाती स्वच्छतेसंदर्भात देखील भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, 'रुग्णालयातील स्वच्छता अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांमध्ये देखील स्वच्छतेची काळजी घेण्यात आली आहे.' अशाप्रकारे त्यांनी त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार अबिरा धर यांचे आभार मानले. कोरोना व्हायसरने जगात दहशत माजवली असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.