कल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे.

Updated: Jun 26, 2020, 10:00 PM IST
कल्याण-डोंबिवलीच्या कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधली कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी बघता उद्यापासून ३२ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीमधल्या ३२ कंटेनमेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असेल. या ३२ ठिकाणी किराणा दुकानांना होम डिलिव्हरीची मुभा असेल, तसंच भाजी विक्री एका ठिकाणी न बसून फिरून करावी लागणार आहे. 

दूध विक्री आणि अत्यावश्यक सेवा या सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली होती. या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या भागांमध्ये लॉकडाऊन