पत्रीपूल मार्चपर्यंत नागरिकांसाठी खुला

तिसऱ्या प्रस्तावित पुलाचं काम जून २०२०मध्ये सुरू होईल.

Updated: Nov 17, 2019, 11:31 PM IST
पत्रीपूल मार्चपर्यंत नागरिकांसाठी खुला

कल्याण : कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. तसेच तिसऱ्या प्रस्तावित पुलाचं काम जून २०२०मध्ये सुरू होईल. पत्री पुलाच्या गर्डरचं काम ५० टक्के पू्र्ण झालं आहे. गर्डर तयार करण्याचे काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु आहे. कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी हैद्राबादला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंते, कार्यकारी अभियंता, कंत्रटदार आणि ग्लोबल स्टील पदाधिकारी उपस्थित होते.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या पत्रीपूलाचे काम देखील सुरू आहे आणि जून पर्यंत तिसऱ्या पत्रीपूलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पत्रीपूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. 

गेल्यावर्षी १०४ वर्ष ऐतिहासिक पत्रीपूल पाडण्यात आला होते. त्यानंतर या मार्गावरून वाहाने चालवने फार जिकरीचे झाले आहे. एकच उड्डाणपूल असल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न फार गंभीर होत आहे. परिणामी पत्रीपूल होणार कधी असा प्रश्न नेहमी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांपुढे राहतो. 
 
वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे रूग्णवाहिकांना वेळेत रूग्णालय गाठणं देखील शक्य होत नाही. तर आता पुढील वर्षी पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.