महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरपीएफच्या 'त्या' जवानाला नोकरीवरुन काढले

प्रवाशांनी या जवानाला चोप दिला होता.

Updated: Aug 19, 2018, 11:17 AM IST
महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरपीएफच्या 'त्या' जवानाला नोकरीवरुन काढले title=

कल्याण: कल्याण स्थानकात महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्याची सेवेतून कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात १८ जून रोजी राजेश जांगीड या आरपीएफ जवानाने झोपेचे सोंग घेत एका महिलेशी असभ्य वर्तन केले होते. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राजेश जांगीडला चोप दिला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर राजेश जांगीडला निलंबित करुन त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.