कल्याण वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ

 अखेर पोलीसांनी स्वतःच कुदळ फावडं आणि घमेली घेऊन खड्डे भरायला सुरूवात केलीय.

Updated: Aug 6, 2018, 05:24 PM IST

कल्याण : सध्या कल्याण-शीळ रस्त्याची गेल्या काही महिन्यात खड्डयांमुळे अक्षरशः चाळण झालीय. वारंवार सांगूनही संबंधित अधिकारी खड्डे बुजवण्यासाठी कारवाई करत नाहीत.  अख्ख्या शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनं अत्यंत धीम्या गतीनं चालतात. संपूर्ण दिवसभर शहरातली वाहतूक कोंडीचं चित्र असतं.

पोलिसांच्या हातात कुदळं, फावडं  

वैतागून अखेर पोलिसांनी स्वतःच कुदळ फावडं आणि घमेली घेऊन खड्डे भरायला सुरूवात केलीय. गेल्या महिन्यातच खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला. त्यानंतर प्रशासनाने खड्डे बुजवण्याचा देखावा केला...अर्धवट कामं टाकून कर्मचारी आणि अधिकारी गायब झाले...शहरातल्या नागरिकांचे हाल मात्र गेल्या काही दिवसात वाढतचं गेले आहेत. आता पोलिसांची ही दृश्यं बघून तरी प्रशासनाला जाग येईल का ? असा प्रश्न विचारला जातोय.