कमला मिल आगप्रकरणी 5 अधिकारी निलंबित

पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता लागल्याचा अंदाज आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 29, 2017, 05:51 PM IST
कमला मिल आगप्रकरणी 5 अधिकारी निलंबित title=

मुंबई : कमला मिलमध्ये पबला आग लागल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या संबंधित पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

पाच अधिकारी निलंबित

यात पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, ज्युनिअर इंजीनियर धनराज शिंदे, सब इंजीनियर महाले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पडगिरे आणि अग्निशमन अधिकारी एस एस शिंदे यांचा समावेश आहे.

आगीत 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता लागल्याचा अंदाज आहे. 

एका वर्षात किती हॉटेल्स वाढले?

कमला मिलमध्ये मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात हॉटेल्सची संख्या वाढली आहे. या हॉटेल्सना बेकायदेशीर परवानगी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.