मुंबई : कमला मिल आगीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत. या तीन सदस्यीय समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा समावेश आहे.
त्यांच्यासोबत एक वास्तूरचनाकार, नगरविकास खात्याशी संबंधित असलेल्या माजी अधिका-याचा समावेश होणार आहे. २३ फेब्रुवारीला या समितीतल्या सदस्यांची नावं जाहीर होणार आहे. आगीच्या कारणांची चौकशी करून नियमांचं उल्लंघन कशा प्रकारे आणि कोणी केलं याबद्दलची चौकशी ही समिती करेल.
दरम्यान कमला मिल कम्पाउंड अग्नीतांडवप्रकरणी सर्व ११ आरोपींचा जामीनअर्ज मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळलाय.
मोजो ब्रिस्टो पबचे मालक युग टुली आणि युग पाठक, वन अबव्ह पबचे मालक जिगर संघवी, कृप्रेश संघवी आणि अभिजीत मानकर, कमला मिल कम्पाउंड मालक रमेश गोवानी, हुक्का सप्लायर उत्कर्ष पांडे, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी तसच वन अबव्हचे मॅनेजर केवीन बावा आणि लोपेज या ११ जणांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने फेटाळलाय.