नगरसेवक कप्तान मलिकांचा कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल

 नगरसेवक कप्तान मलिक हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आहेत.

Updated: Jan 14, 2020, 10:22 PM IST
नगरसेवक कप्तान मलिकांचा कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईतल्या कुर्ल्यातील रस्त्याचे काम सुरू असताना खाजगी कंपनीचे 4 कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते त्याच वेळी प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक कप्तान मलिक पोहचले आणि कामाची परवानगी आहे का असा जाब विचारत त्यांना मारहाण केली. 

हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही चित्रफीत आपली असल्याचं मान्य करत हा व्हीडिओ 1 महिना आधीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. या कामगारांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत होता. खाजगी कंपनीचे अधिकारी पालिकेचं ऐकत सुद्धा नाही म्हणून मला हे पाऊल उचलणं भाग पाडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कामगारांना मारहाण करणाऱ्या कप्तान मलिकांवर कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहावं लागेल.