'केम छो', मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांना भाजपचं आवाहन

गेली २५ वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप सरसावली आहे.

Updated: May 21, 2022, 01:13 PM IST
'केम छो', मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांना भाजपचं आवाहन   title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेल्या माहितीअंती न्यायालयाने मान्सून असणाऱ्या विभागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक येथे जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने येथे पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. ते असले तरी या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत.

गेली २५ वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप सरसावली आहे. अधिकाधिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

याचाच एक भाग म्हणून भाजपने मुंबईतील गुजराती समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी 'केम छो'चा नारा दिलाय. मुंबईत ज्या ठिकाणी गुजराती मतदार जास्त आहेत अशा ठिकाणी भाजपने गुजराती टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. 

भाजपच्या या गुजराती टास्क फोर्समध्ये 1000 प्रचारक आहेत. गुजरातीबहुल वस्ती असलेल्या भागात घरोघरी जाऊन हे प्रचारक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराची हा टास्क फोर्स पोलखोल करणार आहे.