मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) मोठा दिलासा मिळाला आहे. केतकीला न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. केतकीने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या प्रकरणी ठाणे न्यायलयाने केतकीला जामीन देत दिलासा दिला आहे. केतकीला 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. (ketki chitale granted bail by thane sessions court for making controversial post about ncp chief sharad pawar)
केतकीला शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. केतकी 14 मे पासून पोलीस कोठडीत होती. मात्र आता जामीन मिळाल्याने केतकीची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान 16 जूनला ठाणे न्यायलयानेच केतकीला एट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर केला होता. तेव्हा केतकीला 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.