मुंबई : सुमारे ५० वर्ष जुना असलेला आणि डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल प्रमुख दुवा मानला जातो. आता कोपर उड्डणपुलाच्या पाडकामाला अखेर सुरूवात होणार आहे. पुढील १० दिवसांत म्हणजे लॉकडाऊन संपण्यापूर्वी पूलाच्या कामाला चालना मिळणार आहे. उड्डाणपूल पाडण्याचे नियेजन येत्या दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे पूल २८ ऑगस्ट २०१९ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे डोंबिवलीकरांना ठाकुर्लीपूलाचा वापर करावा लागत आहे. परिणामी कल्याण आणि डोबिंवलीतील वाहने एकाच पूलाचा वापर करत असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश रेल्वेने दिले होते. त्याचप्रमाणे आता कल्याणमधील पतरीपूलाचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे येत्या काही काळात कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागेल हे मात्र नक्की.