कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस

 कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस आयोगाने सरकारकडे केली आहे. 

Updated: Jan 31, 2020, 09:04 PM IST
कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस title=

मुंबई : अपुरा निधी, वेळेत पगार न देणे, सरकारचे गंभीर नसणे अशामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस आयोगाचे  प्रमुख माजी न्यायमूर्ती जयनारायण पटेल यांनी सरकारकडे केली आहे. तसे पत्र आयोगाकडून सरकारला देण्यात येणार आहे, असे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे हा आयोग गुंडाळणार का की त्याला जीवदान देणार याचीच चर्चा सुरु झाली आहे.

जयंत पटेल आणि सुमित मुलिक हे आयोगाचे सदस्य आहेत. ५ सप्टेंबर २०१८ पासून आयोगाचे कामकाज तसेच सुनावणीला सुरुवात झाली अजूनही सुनावणी सुरू आहे. सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार होईल आणि तो सरकारने सुरू केला जाईल. मात्र चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस करण्यात आल्याने चौकशी अहवाल तयार होणारच नाही, अशी शक्यता आहे.